येशील ना या गीत चे गायक केवल वालंज हे आहेत. ह्या गीत ला संगीत केवल वालंज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द डॉ.श्रीहरी वि. गोकर्णकर यांनी लिहिले आहेत. आणि रेडबल्ब संगीत यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | येशील ना |
गायक: | केवल वालंज |
संगीत: | केवल वालंज |
गीत: | डॉ.श्रीहरी वि. गोकर्णकर |
संगीत लेबल: | रेडबल्ब संगीत |
Yeshil Na Lyrics in Marathi
आठव तुझी दाटे मनी
हूरहूर ती हृदयातही
डोळे तुझ्या वाटेवरी
येशील ना शिणले जरी
स्मरते मला अजुनि
भेट आपुली
भेट कोवळी ती
पावसातली
अंग अंग चिंब ओले
जीव धुंदले
धडधड उरात दोन्ही
श्वास रोखुनि
तू श्वास रे होऊन जिवा
येशील ना माझ्या उरी
डोळे तुझ्या वाटेवरी
येशील ना शिणले जरी
स्मरतो मला अजुनि
तो चांदवा
तो गारवा अन्
तो मारवा
शिंपूनिया सडा जो
होई बावरा
प्राजक्त कोवळा का
स्मरतो तुला
वा-यासवे, गंधाळुनी
देशील का संजीवनी
डोळे तुझ्या वाटेवरी
येशील ना शिणले जरी