तू शोधून घे आसमान | Tu Shodhun Ghe Aasman Lyrics – पंकज दत्तू वरुणागसे 2021

0
2026
Tu Shodhun Ghe Aasman
गाण्याचे शीर्षक:तू शोधून घे आसमान
गायक:ऋषिकेश शेलार
गीत:पंकज दत्तू वरुणागसे
संगीतकार:पंकज दत्तू वरुणागसे
संगीत लेबल:चेतन गरुड प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड

Tu Shodhun Ghe Aasman Lyrics in Marathi

तु शोधून घे..
अंधार दाटला आभाळ फाटलं
म्हसनातून अंगार उडून रान पेटलं
पाठीशी उभी तुझ्या काळी आई
नशिबाशी रे तुझी ही लढाई
मोडूनीया गेला खेळ तरी सारं खुलून येईल जिनं
तू शोधून घे आसमान तुझ गड्या शोधून घे आसमान

चाल निखार्यातूनी घे शोध नव्या दीसाचा
बोचतील बोल पी समजून घोट विखाचा
अमावसेची किर्र रात करील जरी घात रे
उधळून दे कर संकटावरी हसून मात रे

उराशी सपान घेवून वाटणं चाल ही रोखू नको
सटवीचा जरी कोप झाला तरी मागं तू सरू नको
पावूल धीरानी टाखं खरं तू लोकाला सांगू नको
पेटून उठ तू उमेदीनं कुणापुढ रे झुकू नको
पाठीशी उभी तुझ्या काळी आई
नशिबाशी रे तुझी ही लढाई
मोडूनीया गेला खेळ तरी सारं खुलून येईल जिनं
तू शोधून घे आसमान तुझ गड्या शोधून घे आसमान

उतू नको मातू नको लेकरा वसा हा सोडू नको
लालच दावील दमडीची कुणी त्यालाबी भाळू नको
ऊन सावलीचा खेळ रोजचा हा शकुन मानू नको
येईल भरती पुन्हा समींदरा असरू ढाळू नको

पाठीशी उभी तुझ्या काळी आई
नशिबाशी रे तुझी ही लढाई
मोडूनीया गेला खेळ तरी सारं खुलून येईल जिनं
तू शोधून घे आसमान तुझ गड्या शोधून घे आसमान

Tu Shodhun Ghe Aasman Lyrics in English

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here