तू असशी जवळी – Tu Asashi Javali Lyrics – मंदार आपटे

0
918
Tu-Asashi-Javali

तू असशी जवळी या गीत चे गायक मंदार आपटे हे आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द इंद्रनील तावडे यांनी लिहिले आहेत. आणि टाइम्स म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:तू असशी जवळी
गायक:मंदार आपटे
गीत:इंद्रनील तावडे
संगीत लेबल:टाइम्स म्युझिक मराठी

Tu Asashi Javali Lyrics in Marathi

तू असशी जवळी जेंव्हा
पानात गारवा भिजतो
तू असशी जवळी जेंव्हा
पानात गारवा भिजतो

नाजुकशा पदस्पर्शाने
रानात केवडा फुलतो
तू असशी जवळी जेंव्हा
पानात गारवा भिजतो

दारात उभी असताना
तोरणही संगीत होते
दारात उभी असताना
तोरणही संगीत होते

या लालभडक वाटेला
मग हिरवी किनार येते
तू असशी जवळी जेंव्हा
पानात गारवा भिजतो

तू येशी जवळी जेंव्हा
हिरवळही दरवळ होते
तू येशी जवळी जेंव्हा
हिरवळही दरवळ होते

चांदणे फुलांचे वरती
गंधाचे गाणे गाते
तू असशी जवळी जेंव्हा
पानात गारवा भिजतो

हे असे कसे ग जुळले
दृढ नाते जन्मभराचे
हे असे कसे ग जुळले
दृढ नाते जन्मभराचे

ही स्वप्ने जागविताना
जे ठरवून विसरायाचे
तू असशी जवळी जेंव्हा
पानात गारवा भिजतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here