स्वप्नातल्या Swapnatlya Lyrics – Aarya Ambekar 2020

0
1574
Swapnatlya
गाण्याचे शीर्षक:स्वप्नातल्या
गायक:आर्या आंबेकर
कलाकार:हेमल इंगळे आणि अशोक ढगे
गीत:जया चव्हाण
संगीत लेबल:चव्हाण स्टुडिओ

Swapnatlya Lyrics in Marathi

स्वप्नातल्या दुनियेतुनी सतत्यात तू येशील का?
हळुवार चाहूल पावलांची तुझ्या कानी तू भरशील का?
मन हे फसले, उगीच रुसले
फुगूनी बसले, वाटेवरी
न काही समजे, न काही उमजे,
वाट पाही मन वेडे तुझे
साथ तुझी, देण्या सदा आतुर झाले, मन हे माझे

स्वप्नातल्या दुनियेतुनी सतत्यात तू येशील का?
रंग सारे, धुंद वारे, खुणावती हे इशारे
मोकळ्या रानी साद घाली, शोधी शोधी तुला रे
रंग सारे, धुंद वारे, खुणावती हे इशारे
मोकळ्या रानी साद घाली, शोधी शोधी तुला रे
येण्या तुझ्या, वाटेकडे, खिळले खिळले क्षण हे सारे

स्वप्नातल्या दुनियेतुनी सतत्यात तू येशील का?
अनोळखी अनोळखी वाटे वाटे जग हे सारे
रमून मी तुझ्यासवे, जगेन हे जीवन न्यारे
आतुर मी, होण्या तुझी, पाऊल चाले शोधी तुला रे

स्वप्नातल्या दुनियेतून सतत्यात तू येशील का?
मन हे फसले, उगीच रुसले
फुगूनी बसले, वाटेवरी
न काही समजे, न काही उमजे,
वाट पाही मन वेडे तुझे
साथ तुझी, देण्या सदा आतुर झाले, मन हे माझे
स्वप्नातल्या दुनियेतून सतत्यात तू येशील का?

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here