लागीर Lagir Lyrics – विक्की वाघ 2021

0
291
Lagir Lyrics
गाण्याचे शीर्षक:Lagir Lyrics
गायक:विक्की वाघ
संगीत: विक्की-मोहित
गीत:विक्की वाघ
संगीत लेबल:टिप्स मराठी

Lagir Lyrics in Marathi

कावऱ्या बावऱ्या मनात वादळ उठले
साजिरे गोजीरे निनाद काहूर कसले
कावऱ्या बावऱ्या मनात वादळ उठले
साजिरे गोजीरे निनाद काहूर कसले

आता तरी सांगना ठाव मनीचा तुझ्या
कळू दे जरा मला डाव कोणी साधिला
डोळ्यातले भाव राहिले मुके
लागीर झालं जी लागीर, भारल इश्कान भारलं
लागीर झालं जी लागीर, भारल इश्कान भारलं

नाद काळजाचा का वेड लावी जीवा
रोजचा गारवा का आज वाटे नवा
नाद काळजाचा का वेड लावी जीवा
रोजचा गारवा का आज वाटे नवा

उन्ह सावलीचे खेळ हे, भास चाहुलीचे मेळ हे
जुळतील ही खुलतील ही या रेशमाचे धागे
आता तरी सांगना ठाव मनीचा तुझ्या
कळू दे जरा मला डाव कोणी साधिला
डोळ्यातले भाव राहिले मुके,
लागीर झालं जी लागीर, भारल इश्कान भारलं
लागीर झालं जी लागीर, भारल इश्कान भारलं

तुझे लाजने जणू चांदणे नभा आड लपती सये
तुझे लाजने जणू चांदणे नभा आड लपती सये
तुझे हासने जणू काजवे आसमंत उजळी दिवे
तुझ्या चाहुली लळा लावती, नैन बावरे तुला शोधती
दिशाहीन ही जरी वाट ती तरी चाललो मी तुझ्या सोबती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here