हुप्पा हुय्या | Huppa Huyya Lyrics – हुप्पा हुय्या

0
10162
Huppa Huyya Lyrics

हुप्पा हुय्या हे गीत हुप्पा हुय्या या चित्रपट मधले असून या गीत चे गायक स्वप्नील बांदोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजित परब यांनी दिली आहे.

गाण्याचे शीर्षक:हुप्पा हुय्या
चित्रपट:हुप्पा हुय्या
गायक:स्वप्नील बांदोडकर
संगीत:अजित परब

Huppa Huyya Lyrics in Marathi

हुप्पा हुय्या जय बजरंगा…….
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
जय हनुमान जय जय हनुमान……
जय जय……

राम दासा च्या पुण्याईची काय सांगू महती
अकारा गावी प्रकट झाले अकरा मारुती…..
कुणी लंका जाळली….
कशी सीता मिळाली
कुणी आणली संजीविनी

आई कुणाची अंजनी
कशी सीता मिळाली
कुणी आणली संजीविनी
आई कुणाची अंजनी

रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा
उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी उडवी दाणा दाण
तेच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान…….

जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम…..
मारुती चुन्याचा असे शहापूराचा
उग्र चेहऱ्याचा गोंड्याच्या टोपीचा…
हा मसूरचा हनुमान देखणा छान
होता दर्शन तयाचे लागते ध्यान

चाफडचा दास मारुती मुद्रा भक्तीची
प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची
शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार
बाल मारुती गोजिरा भक्ता आधार
त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप
चांदीचे डोळे देवाचे भावती खूप

न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी
विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण
तेच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान…….
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम…..
जय जय……

गोड्याच्या तोंडाची मूर्ती माजगावची
झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची
कृष्णाकाठी बहे निसर्गाचे देण
श्री रामासाठी धावले हनुमान

कौलारू मंदिर आणि वाहता ओढा
मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा
सपाट दगडावर कोरली छान
आहे पर्गागावची मूर्ती ती लहान
आहे देऊळ सुंदर बत्तीस शिराळा
तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला

आणाया रामराज त्या बजरंगाच आज
करूया जय जयकर गाऊया गोड मुखाने नाम
तेच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान…….
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम….

चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान
जीवंत असुनी मेलेल्या दे संजिवनी आणून
कुविचार जे मनातले तू जाळी त्याची लंका
विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका

सूर्याचा करी घास, वीरांचा वीर खास
करितो जो उड्डाण देव मग घालितो थैमान
तेच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान…….

जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम…..
जय जय…….
हुप्पा हुय्या जय बजरंगा

Huppa Huyya Lyrics in English

More Song:

Huppa Huyya Lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here