हलकी हलकी | Halki Halki Lyrics – Well Done Baby 2021

0
838
Halki Halki Lyrics
गाण्याचे शीर्षक:हलकी हलकी
चित्रपट:वेल डन बेबी
गायक:रोहन प्रधान
संगीत: रोहन रोहन
गीत:वालय मुलगुंड
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Halki Halki Lyrics in Marathi

थांब ना, हरवले मन शोधूया पुन्हा
थांब ना, बहरले क्षण वेचूया खुणा
वळणाशी थांबली वाट ही
दे तुझी सावली..

जगण्याची आस ही कोवळी
दे तुझ्या चाहुली..
हलकी हलकी दे साद हलकी
हलकी हलकी दे साथ हळवी

त्या दिवसांना आठवुनी, लाजते हे चांदणे
गंध होता बोलण्याला, धुंद होते हासणे
तो अबोला गोड होता, रेशमाचे ते दुवे
सोड आता हा दुरावा, बंध जोडूया नवे
वळणाशी थांबली वाट ही
दे तुझी सावली..

जगण्याची आस ही कोवळी
दे तुझ्या चाहुली..
हलकी हलकी दे साद हलकी
हलकी हलकी दे साथ हळवी

साद ऐकूनी सुखाची, गूज सारे बोलूया
ज्या चुकांनी घात केला, ते निखारे जाळूया
शांत करुया वादळे ही, प्रेम वारे वाहूया
सावरुनी एक होऊ, स्वप्नरंगी न्हाऊया
वळणाशी थांबली वाट ही
दे तुझी सावली..

जगण्याची आस ही कोवळी
दे तुझ्या चाहुली..
हलकी हलकी दे साद हलकी
हलकी हलकी दे साथ हळवी

Halki Halki Lyrics in English

More Song:

Halki Halki Lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here