घे उंच भरारी या गीत चे गायक केवल वालंज हे आहेत. ह्या गीत ला संगीत केवल वालंज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द विपुल शिवलकर यांनी लिहिले आहेत. आणि रेडबल्ब संगीत यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | घे उंच भरारी |
गायक: | केवल वालंज |
संगीत: | केवल वालंज |
गीत: | विपुल शिवलकर |
संगीत लेबल: | रेडबल्ब संगीत |
Ghe Unch Bharari Lyrics in Marathi
कोवळ्या कळीचे
कोवळे हे थोडेसे
रंग बहरू दे
मोकळ्या मनाने
मोकळा तिला हा
श्वास घेऊ दे
उडू दे तिला या मुक्त आभाळी
पाहू दे तिलाही स्वप्ने तिची सारी
बेधुंद हो ना तू जरा
हरवूनी तू साऱ्या दिशा
सोडूनी ये तोडूनी दे तू बंधने सारी
बन पाखरू घे ना आता तू उंच भरारी
घे रंग नवे अन् रंगवूनी दे दुनिया तूझी
तू चाल पुढे अडथळे तुला आले कितीही जरी
बिलगेल तुला आनंद तुझा
बरसेल असा पाऊस पुन्हा
मुठीत घे साऱ्या दिशा
गवसेल तूला मग सूर नवा
बेधुंद हो ना तू जरा
हरवूनी तू साऱ्या दिशा