दख्खनचा राजा ज्योतिबा Dakhkhancha Raja Jyotiba Lyrics – Star Pravah

0
3593
Dakhkhancha-Raja-Jyotiba

Dakhkhancha Raja Jyotiba Lyrics in Marathi

ज्योतिबा च्या नावाने हो
घेऊन हाती सासण काठी
भक्त येती दुरून
शंकराच्या अवताराला
बघती डोळ भरून

ए दौडत आला सफेद घोडा
घेऊन देव आला
दख्खनचा राजा ज्योतिबा माझा

हो अंबाबाई ची हाक ऐकली देवाने
सत्पर रणी धावल
उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन
रत्नासुर मारील

ए डोंगरात नांदतो
देव माझा
आणि संकटात तारितो
देव माझा

हो देवांचा हा देव माझा
डमरूनाथ डम डम ला भिडे आभाळा
ज्योतिबाची ऐसी ख्याती
नवसाला तो पावतो

पायावरती ठेव माथा
किरपा भक्तावर करतो
ए दौडत आला सफेद घोडा
घेऊन देव आला
दख्खनचा राजा ज्योतिबा माझा

चांगभल चांगभल
ज्योतिबाच्या नावाने चांगभल
चांगभल चांगभल चांगभल चांगभल
ज्योतिबाच्या नावाने चांगभल
चांगभल चांगभल चांगभल चांगभल
माझा ज्योतिबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here