बोटीनं येशील का | Botin Yeshil Ka Lyrics – केवल वालंज 2020

0
1023
Botin-Yeshil-Ka
गाण्याचे शीर्षक:बोटीनं येशील का
गायक:केवल वालंज आणि स्नेहा महाडिक
स्टार कास्ट:प्रतीक्षा मुंगेकर, अभिजीत आमकर
संगीत:केवल वालंज
गीत:प्रवीण कोळी आणि योगिता कोळी
संगीत लेबल:सप्तसुर संगीत

Botin Yeshil Ka Lyrics in Marathi

जैशी आभाली सजली चंद्राची कोर
तशी दिसतय भारी ही कोळ्याची पोर
माझे मनान दरलय रुप तुझ न्यार
कधी जुलेल आपली ही पीरतीची डोर

तुझा आशिक हाय मी पुराना
तुझे नखऱ्याव दिल हाय दिवाना
आपल्या पीरतीची दर्या सागरान
चल सफर करू जरा

बोटीन येशील का ग पारू
बोटीन येशील का
माझे संगतीन फिरवीन गो
रानी माझी तु होशील का

राणी मी दर्याची हाय
रूपान देखणी हाय
माझी अदा ही रं लाखमोलाची हाय
सारा कोळीवारा माझे मंघारी फिरतंय
माझे साठी तू पोरा सांग करशील काय

ठेविन सुखी तुला पोरी देतय
वादा यो दर्या किनारी
आपल्या पीरतीची दर्या सागरान
चल सफर करू जरा

बोटीन येशील का ग पारू
बोटीन येशील का
माझे संगतीन फिरवीन गो
रानी माझी तु होशील का

जीव रुतलाय ग तुझ्यामंदी
नको बहाना करू ग पोरी
मांगन घालीतो तुला मी आता
येशील का मंगलेदारी..

तुझे इश्काचा यो नजराना
हाय कबूल मला रं नाखवा

आपल्या पीरतीची दर्या सागरान
चल सफर करू जरा
बोटीन येणार हाय मी नाखवा
बोटीन येणार हाय

तुझे संगती फिरणार हाय
रं नाखवा तुझीच होणार हाय
बोटीन येणार हाय मी नाखवा
बोटीन येणार हाय
तुझे संगती फिरणार हाय
मी राणी तुझीच होणार हाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here