भासतेस जशी | Bhastes Jashi Lyrics – प्रशांत तिडके 2021

0
546
गाण्याचे शीर्षक:भासतेस जशी
चित्रपट:प्रशांत तिडके
गायक:केवल वालंज आणि नितीन कुटे
संगीत: नितीन कुटे-अमोल दाते
गीत:प्रशांत तिडके
संगीत लेबल:उर्वी सिंग – अजज अहमद

Bhastes Jashi Lyrics in Marathi

उन्हा मधली सर ओली
परदेशात माय बोली
भासते जशी
तू भासतेस तशी

काठावरची अधीर लाट
गावाकडची पायवाट
भासते जशी
तू भासतेस तशी

हो भास् हा तुझा
होतो रोज मजला का
ही आस का तुझी
लागे रोज़ या जीवा

ध्यास लागला
तुझा आहे होण्याचा
सहवास हा तुझा
वाटे का हवा हवा

हृदया मधली ती आरोळी
आनंदाची एक टाळी
मंद झुळूक ती सांजवेली
भासते जशी
तू भासतेस तशी

भर रातीला रातरानी
पुराणातली गोड कहानी
भासते जशी
तू भासतेस तशी

हो रोज रातिच्या
स्वप्नामधे तुला बघतो
तुझ्या मनातले वाचावे कैसे
मी रोज़ शिकतो

मी राजा जर तरची राणी
सुरुवात अन अंत दोन्ही
भासतात जशी
तू भासतेस तशी

भासतात जशी
तू भासतेस तशी
भासतात जशी
तू भासतेस तशी

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here