Angai Geet Lyrics in Marathi
घे कमळ पाकळ्या मिटवून
शंभू बाळा
राजस सुकुमार
अरे लडिवाळा
तू निज निज रे
निज रे माझ्या बाळा
तू निज निज रे
निज रे माझ्या बाळा
शिव माथ्यावरची गंगा
कमळात झोपला भुंगा
थांबला शिवारी वारा
थांबला शिवारी वारा
आभाळी निजला तारा
बघ निजला रे
चंद्र निळा आभाळा
तू निज निज रे
निज रे माझ्या बाळा
तू मिटून घे रे नेत्र
बघ किती हि झाली रात्र
पंखात तुला मी घेते
गहिवरली ममता देते
तू अत्तर भिजला काया
तुजवरी जगाची माया
लाभू दे तुला रे किर्ती
तेजाने न्हावू दे धरती
उजळू दे आभाळी
तव तेजाच्या ज्वाळा