हे सुंदरा – He Sundara Lyrics in Marathi – तू ही रे 2015

0
2191
sundara
गाण्याचे शीर्षक:हे सुंदरा
चित्रपट:तू ही रे (2015)
गायक:आदर्श शिंदे
संगीत:शशांक पोवार
गीत:प्रा. कुंतीनाथ कार्के
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

हे सुंदरा हे गीत तू ही रे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे हे आहेत. ह्या गीत ला संगीत शशांक पोवार यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द प्रा. कुंतीनाथ कार्के यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

हे सुंदरा
जलपरी फार लाजरी, प्रीतबावरी, लाविते छंद
भरजरी शालू अंजीरी, मदन मंजिरी, फिरे स्वच्छंद
रतीरूप अजिंठा शिल्प, कोरिले कुणी, उभी सत्कारा…
हे सुंदरा….

गजगजीत कोवळी काया की बाभळ तरणी ताठी
तू नटून थटून येता, उठतात वादळे मोठी
नजरेचे मारुनी तीर, कैकास करी घायाळ
तू पोर द्वाड मुलखाची, लई अवखळ धीट खट्याळ
सुंदरा असावी कशी..

सुंदरा असावी कशी, अप्सरा जशी, वेणीमधे गजरा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा..
छबीदार सुंदरी नटी, उभी एकटी, हळदीचा रंग
चवदार कवळी काकडी, दिसे फाकडी, चवळीची शेंग
कमरेत जरा…

कमरेत जरा बारीक, जशी खारीक, गोडवा न्यारा हा न्यारा
डोळ्यात शराबी नशा…
डोळ्यात शराबी नशा, गालावर उषा, तोंडलं ओठी
चपळाक हरणीची गती..

चपळाक हरणीची गती, नार गुणवती, सांडलं मोती
ही गोड पेरूची फोड
ही गोड पेरूची फोड, लावते वेड, प्रीतीचा वारा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here