हृदयी वसंत फुलताना प्रेमास – Hrudhayi Vasant Fulatana Premas Song Lyrics in Marathi – Ashi Hi Banava Banavi 1988

0
1717
Hridayi-Vasant-Fultana-Premat
गाण्याचे शीर्षक:हृदयी वसंत फुलताना प्रेमास
चित्रपट:अशी ही बनवा बनवी
गायक:अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर, सुहासिनी, सुरेश वाडकर
संगीत दिग्दर्शक:अनिल, अरुण

हृदयी वसंत फुलताना प्रेमास हे गीत अशी ही बनवा बनवी या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर, सुहासिनी, सुरेश वाडकर हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक अनिल, अरुण आहेत.

Marathi Lyrics

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे……
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे…

मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको……
गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे…
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे…….

पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय…
अवघी अवनी सजली धुंद मोहरली……
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे…
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे…
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे …….

मदभारा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय …
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी…
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..
हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा…
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे……
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here