गाण्याचे शीर्षक: | हल्ला हल्ला |
चित्रपट: | हुप्पा हुय्या |
गायक: | वैशाली सामंत, अवधूत गुप्ते |
संगीत दिग्दर्शक: | अजित परब |
हल्ला हल्ला हे गीत हुप्पा हुय्या या चित्रपट मधले असून या गीत चे गायक वैशाली सामंत, अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक अजित परब आहेत.
Marathi Lyrics
गोऱ्या….. रंगाचा
घाऱ्या……. डोळ्याचा….
गरम गरम माझ्या ज्वानीचा
नरम नरम लाल ओठाचा
लपक झपक माझ्या कमरेचा
चुमक चुमक नाद घुंगरांचा
सौंदर्याची मी फुलन देवी चोरीन तुमचा डल्ला
झाला हल्ला हल्ला हल्ला
झाला हल्ला हल्ला……..
है….. पिवळा धमक बघ तुझा
मक्याच कणीस गोड गोड
खाईन तुला भाजून खरपूस
काळजाला हलवी तुझा नखर्याचा ठुमका
है जवानीच्या बिडीचा देणा एक झुरका
झाला हल्ला हल्ला…..
वर खाली वर खाली होईन नजर
पडला जरासा पदर
हाय……
धक धक धक धक उरात माझ्या
भलताच झाला असर
कुठे लपाल कसे वाचाल
जादू गुलाबी करील हाल
तुम्ही चुकाल मग फसाल
सारा लुटून नेईन माल
तुमच्याच चावीन खोलीन ताला
जिंकीन प्रेमाचा किल्ला
झाला हल्ला हल्ला हल्ला
झाला हल्ला हल्ला……..
गोऱ्या……. रंगाचा
घाऱ्या……. डोळ्याचा….
गरम गरम माझ्या ज्वानीचा
नरम नरम लाल ओठाचा
लपक झपक माझ्या कमरेचा
चुमक चुमक नाद घुंगरांचा
सौंदर्याची मी फुलन देवी चोरीन तुमचा डल्ला
झाला हल्ला हल्ला हल्ला
झाला हल्ला हल्ला…….