सुन्या सुन्या मनामध्ये – Sunya Sunya Manamadhye Song Lyrics in Marathi – टाईमपास 2 (2015)

0
2019
sunya-sunya
गाण्याचे शीर्षक:सुन्या सुन्या मनामध्ये
चित्रपट:टाईमपास 2 (2015)
गायक:आदर्श शिंदे, केतकी माटेगावकर
संगीत:चिनार, महेश
गीत:मंगेश कांगणे

सुन्या सुन्या मनामध्ये हे गीत टाईमपास 2 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे, केतकी माटेगावकर हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक चिनार, महेश आहेत.

Marathi Lyrics

शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
जशी राजा रानीची गं जोडी
शेतीबागा माडाची गं वाडी

नवरीला चांदण्याची साडी
सुन्या सुन्या मनामध्ये… सूर हलके
नव्या जुन्या आठवणी… भास परके
दारी सनईचे सूर… दाटे मनी हूर हूर

चाले विरहाचा पुढे वारसा…
फुलमाळा मंडपाच्या दारी
झालरींना सुखाच्या किनारी
नवी नाती ओळखीची सारी

सपनांची दुनिया गं न्यारी
भावनेची तोरणे… वेदनेच्या झालरी
नाद करिती चौघडे… वाढते घुसमट उरी
ओळखीचे चेहेरे… मी अनामिक एकटी

संपले सारे दुवे… अन आस ही सरली
गाव माझा दूर आला आसवांचा पूर
प्रेम नव्याने का देई यातना…
हळदीने सजली गं काया

सासरची मिळेल गं माया
वेड लावी धन्याची गं भेट
डोळ्यातल्या काजळाची तीट
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव

विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेः तेंघ्रिऽयुगं स्मरामि
आठवांचे कुंचले… रेखिती काटेकुटे
कोरडे तळहात हे… मेंदीची वर जळमटे
मोकळ्या माथ्यावरी… देवळाची पायरी

फितूर झाली दैवते…रीत ही कुठली
दैव मानी हार आली बंधनाला धार
भोवती निराशेचा उडे पाचोळा

शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
जशी राजा रानीची गं जोडी
नवरीला चांदण्याची साडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here