गाण्याचे शीर्षक: | साज सोन्याचा |
चित्रपट: | शुभ लग्न सावधान (2018) |
गायक: | पल्लवी केळकर |
संगीत: | चिनार आणि महेश |
गीत: | मंगेश कांगणे |
साज सोन्याचा हे गीत शुभ लग्न सावधान या चित्रपट मधले असून या गीत चे गायक पल्लवी केळकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत चिनार आणि महेश यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
साज सोन्याचा, हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई
बंध न्यारा हा कळेना तुजला
उभी बाजूला मी सावरून स्वप्ने सारी
होऊ दे जीव जरा कावरा बावरा
गुंतुनी बघ जरा तू एकदा अरे एकदा
साज सोन्याचा, हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई
जोडला कुणी दुवा रेशमी धागा नवा
हा जीवनाचा हात हाती बिलगला
वाट हि वेगळी देउनी जाते मनाला
छंद वेडा ना तुला कळला
होऊ दे जीव जरा कावरा बावरा
गुंतुनी बघ जरा तू एकदा अरे एकदा
साज सोन्याचा, हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई