Marathi Lyrics
अरे खोप्यामधी खोपा हितं मायेची पाखर
काडी काडी जमवून हितं बांधलंया घर
कौलं माया ममतेची अन ईश्वासाच्या भिंती
आला सोसाट्याचा वारा तरी नाही त्याची भीती
येती मेंदीची पावलं ओलांडून ह्यो उंबरा
दारी हासते तोरण म्हणे लक्ष्मी आली घरा
दारा खिडक्यांमधून कवडसे आनंदाचे
अंगणातल्या झाडाला झोके बांधले सुखाचे
दृष्ट लागो ना कुणाची असा सोन्याचा संसार
सहकुटुंब सहपरिवार
सहकुटुंब सहपरिवार