सये – Saye Lyrics in Marathi – स्वप्निल बांदोडकर 2020

0
1608
Saye

सये हे गीत चे गायक स्वप्निल बांदोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत शशांक प्रतापवार यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द सहस साखरे यांनी लिहिले आहेत. आणि AME MUSIC INDIA यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:सये
गायक:स्वप्निल बांदोडकर
संगीत:शशांक प्रतापवार
गीत:सहस साखरे
संगीत लेबल:AME MUSIC INDIA

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=yzgwAjp73Yc

पेटवूनी आकाश सारे
दारी आली सांज ही
मोहरूनी गंध वाहे
अंगणीची रातराणी

सये आजही मजसाठी
काळ तेथेच थांबला

श्वास माझे शब्द झाले
गुंफुनी श्वासात गेले
ओघळूनी रात गेली
तुझिया प्राजक्त देही

सये आजही मजसाठी
काळ तेथेच थांबला

सोडूनी काळ्या नभांना
वाऱ्यावरती मोकळे
विरुनी गेली एक काया
छायेच्या निजअंगणी

सये आजही मजसाठी
काळ तेथेच थांबला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here