गाण्याचे शीर्षक: | वाटा वाटा वाटा ग |
चित्रपट: | आनंदी गोपाळ (2019) |
गायक: | प्रियंका बर्वे |
संगीत: | हृषिकेश, सौरभ आणि जसराज |
गीत: | वैभव जोशी |
वाटा वाटा वाटा ग हे गीत आनंदी गोपाळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक प्रियंका बर्वे हे आहेत. ह्या गीत ला संगीत हृषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
I am sorry
मला क्षमा करा याला इंग्रजीत
I am sorry अस म्हणतात
बगा, माफी मागताना हि इंग्रजीचे धडे देतायत
वाटा वाटा वाटा ग
चालिन तितक्या वाटा ग
माथी छाया, पायी ऊन
प्रवास माझा उफराटा ग
वाटा वाटा वाटा ग
चालिन तितक्या वाटा ग
माथी छाया, पायी ऊन
प्रवास माझा उफराटा ग
आ आ
रानफुलाहून फुलणे माझे हट्टी ग
सहा ऋतूंशी जन्माने मी कट्टी ग
मैत्रीण माझी मीच मला
अप्रूप माझे
मैत्रीण माझी मी मला
अप्रूप माझे
आनंदी मी आनंदाची
युक्ती ग
दर्या दर्या दर्या ग
उरात शंभर लाटा ग
दर्या दर्या दर्या ग
उरात शंभर लाटा ग
लखलख मोती माझ्या आत
कसा मी वेचू आता ग
वाटा वाटा वाटा ग
चालिन तितक्या वाटा ग
माथी छाया, पायी ऊन
प्रवास माझा उफराटा ग