लुकलुकले स्वप्न – Luklukle Swapna Lyrics in Marathi – ट्रकभर स्वप्न 2018

0
1414
Luklukle-Swapna
गाण्याचे शीर्षक:लुकलुकले स्वप्न
चित्रपट:ट्रकभर स्वप्न
गायक:सोनू निगम आणि आनंदी जोशी
संगीत:श्रेयश
गीत:श्रेयश
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

लुकलुकले स्वप्न हे गीत ट्रकभर स्वप्न या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सोनू निगम आणि आनंदी जोशी हे आहेत. ह्या गीत ला संगीत श्रेयश यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द श्रेयश यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

लुकलुकले स्वप्न मनाशी
बहरूनी आली नाती
छेडूनि तार उराची
गुणगुणू लागले

ओढ आपल्या प्रेमाची
बंधने गोड जीवाची
दुख हे सारे हसू लागले
बेधुंद झाले क्षण हे सारे

मोहरू हे लागले
रंगून गेले सारे हे नव्याने
सोबती चालले…..

रिमझिम रंग सारे
बरसाया लागले
झिलमीलझील बंध सारे
चमकाया लागले
हो…..

सजले भिजले रंगले
मन हे असे
जन्मोजन्मीचे नाते
हे विणले असे

आपल्याच साठी गंध
सारे दरवळू लागले
दडलेल्या सुखाना
घर हे आपुले
सापडू लागले

जग तू माझे रे
मी राणी तुझी
राजा माझा तू
तूच ध्यानी मनी

सारे मिळाले तुझ्याचपाशी
नको मला काही रे
प्रत्येक श्वासात
सात जन्मात
मी तुला पहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here