गाण्याचे शीर्षक: | रंग माझा वेगळा |
गायक: | आनंदी जोशी आणि मंगेश बोरगावकर |
गीत: | श्रीपाद अरुण जोशी |
Marathi Lyrics
आपुल्या नात्यातले
रंग सारे रंगले
चिंब इतकी जाहले
मी तुझ्यात दंगले
भेटताना दरवळे
श्वास माझा अन तुझा
मोहरुनी लाजते
लागला इतका लळा
दूर किंवा भोवती
तू असावा सोबती
सोबतीने या तुझ्या
साजरा हो सोहळा
रंग उजळे सांग का
सांजवेळी सावळा,
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा…
तू नभाचे बरसणे
तू सुखाची सावली
दुःख होते नाहीसे
आणि सरते काहिली..
दूर जाता तू जरा
वेदना माझ्या मना
हे तुझे असणे इथे
रातराणीच्या खुणा
नाहीशी होते इथे
रात्र काळोखातली
उमलतो माझा तुझा
हा ऋतू बघ कोवळा
ऊन भरल्या अंगणी
चांदण्यांच्या सावल्या
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा