Home Marathi Songs ये ना शोना – Ye na Shona Lyrics in Marathi – बॉईझ...

ये ना शोना – Ye na Shona Lyrics in Marathi – बॉईझ 2 (2018)

0
1255
गाण्याचे शीर्षक:ये ना शोना
चित्रपट:बॉईझ 2
गायक:रोहित राऊत, जुली जोगळेकर
संगीत:अवधूत गुप्ते
गीत:मंदार चोलकर
संगीत लेबल:एव्हरेस्ट मराठी

ये ना शोना हे गीत बॉईझ 2 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक रोहित राऊत, जुली जोगळेकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

नकळत हे झाले असे अन्
मन जुळले माझे तुझे
दरवळतो प्रेमाचा मौसम
जग अवघे माझे तुझे

अनोळखी वाटेवरी
भान हरवले जरी
शहारल्या क्षणातही
तोल सावरताना
ये ना.. शोना ये ना

अबोल स्वप्नांचे
तरंग उठताना
ये बोलुया… डोळ्यातुनी
तुझ्या इशाऱ्याने
उनाड वारा ही

खुणावतो… भासांतुनी
जिथे जिथे … फिरे नजर
तुझा असर…तुझा बहर
ये ना.. शोना ये ना

मनातले सारे
ओठांवरी आले
हुरहूर ही लागे नवी
सुगंध श्वासांचा
श्वासांत भरताना

मिठी जणू उमलावी
तुझ्यात मी.. माझ्यात तू
पुकारतो नवा ऋतू
सारे ….हरवून ये ना

सारे विसरू …. ये ना
गाणे ….गुणगुणताना
रिमझिम बरसात …ये ना

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks