गाण्याचे शीर्षक: | या रे या सारे या |
चित्रपट: | वेंटीलेटर (2016) |
गायक: | रोहन प्रधान |
संगीत: | रोहन-रोहन |
गीत: | मनोज यादव आणि शांताराम मापुस्कर |
संगीत लेबल: | झी म्युझिक मराठी |
या रे या सारे या हे गीत वेंटीलेटर या चित्रपट मधले असून या गीत चे गायक रोहन प्रधान हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक रोहन-रोहन आहेत.
Marathi Lyrics
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया
उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया