गाण्याचे शीर्षक: | मोरया मोरया देवा तुझ्या दारी आलो |
चित्रपट: | उलाढाल |
गायक: | अजय-अतुल, कुणाल गंजेवाळा, अर्ल डिसोजा |
गीत: | अजय-अतुल, जगदीश खेबुडकर, श्रीरंग गोडबोले |
मोरया मोरया देवा तुझ्या दारी आलो हे गीत उलाढाल या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अजय-अतुल, कुणाल गंजेवाळा, अर्ल डिसोजा हे आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द अजय-अतुल, जगदीश खेबुडकर, श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
देवा तुझ्या दारी आलो गुनगान गाया
तुझ्या इना मानसाचा जन्म जायी वाया
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया…..
मोरया मोरया मोरया मोरया…..
ओंकाराच रुप तुझ चराचरा मंदी
झाड येली पाना संगी फुल तु सुगंधी
भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरुप झाली
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया…..
मोरया मोरया मोरया मोरया…..
आदी अंत तुच खरा तुच बुध्दी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाज दश दिशी गजर नामाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया…..
मोरया मोरया मोरया मोरया…..
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वराबा तु घाल पोटी