गाण्याचे शीर्षक: | मुरंबा |
चित्रपट: | मुरंबा |
गायक: | मिथिला पालकर, जसराज जोशी |
गीत: | वैभव जोशी |
मुरंबा हे गीत मुरंबा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मिथिला पालकर, जसराज जोशी हे आहेत.
Marathi Lyrics
कधी कधी ना जगण्याची छोटी होडी
वाऱ्याने हलते थोडी
खरय ना
कधी कधी ना आयुष्य घालते कोडी
आणखीच वाढते गोडी
खरय ना
तुम्हीच सांगा असे होते ना
छोटीशी गोष्ट उतू जाते ना
कसे की हसताना रुसताना नाते बनते
खरय ना
मुरंबा…. मुरंबा….
मुरंबा…. मुरंबा….
ताटामध्ये असलेला बरा
मुरंबा तिकाताच्या सोबतीला बरा
मुरंबा….चाखायची घाई नको
मुरुदेत खरा
कसे ना चालता चालता
नवे वळण येते
स्वताची वाटणारी सावली
जरा दूर जाते
आणि मग हरवत जाते जुनी दिशा दिशा
अजून वाढते प्रवासाची नशा
खरे तर सावली कुठेही जातबीत नसते
आपल्या माणसा सारखी आपल्या आत असते
तरीही उडतो बिडतो गोंधळ जरासा
काखेत कळसा आणि गावाला वळसा
हे पुरावा मागतो…..
पुरावा जरा……२
चवीला बरा खरेय ना
हे मुरंबा ……हे मुरंबा आंबट गोड जरा
ताटामध्ये असलेला बरा
मुरंबा तिखटाच्या सोबतीला बरा
मुरंबा….चाखायची घाई नको
मुरुदेत खरय