गाण्याचे शीर्षक: | माझ्या मना |
चित्रपट: | बकेट लिस्ट (2018) |
माझ्या मना हे गीत बकेट लिस्ट या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
माझ्या मना विसरू नको
कोवळ्या सयेच्या कोवळ्या खुणा
माझ्या मना विसरू नको
कोवळ्या सयेच्या कोवळ्या खुणा
जश्याया उमलत्या अबोली फुलांच्या
इवल्या इवल्या कोवळ्या कळ्या
शब्दांत सांगू शकेना मन हे
सांगू कसे ना कळे
मला उमगले जगणे गं वसले
तुझ्या गोळ स्वप्नांमुळे
मन माझे
बेभान झाले सावरू कसे
बेधुंद झाले भीर-भीर फिरते
बेभान झाले सावरू कसे
बेधुंद झाले भीर-भीर फिरते
आज मी जगते जशी
परक्या मनांची स्पंदने
आत मी जुरते कशी
हरवूनी स्वतःचे असे जगणे
क्षणांत सगळे क्षण हे विखुरले
वेचु कसे ना कळे
श्वासांत शोधू शके ना जगणे
शोधू कुठे ना कळे
मन माझे
बेभान झाले सावरू कसे
बेधुंद झाले भीर-भीर फिरते
बेभान झाले सावरू कसे
बेधुंद झाले भीर-भीर फिरते
आज तू भरूदे मला
रंग या जीवनाचे पुन्हा
बहरून गेल्या दिशा
मन माझे
बेभान झाले सावरू कसे
बेधुंद झाले भीर-भीर फिरते
बेभान झाले सावरू कसे
बेधुंद झाले भीर-भीर फिरते