माझ्या मना आता पुन्हा – Mazya Mana Aata Punha Lyrics in Marathi – लग्न पाहावे करून 2013

0
1341
majhya-mana
गाण्याचे शीर्षक:माझ्या मना आता पुन्हा
चित्रपट:लग्न पाहावे करून
गायक:शंकर महादेवन
संगीत दिग्दर्शक:अजय नाईक
गीत:वैभव जोशी

माझ्या मना आता पुन्हा हे गीत लग्न पाहावे करून या चित्रपट मधले असून या गीत चे गायक शंकर महादेवन हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय नाईक यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव जोशी यानी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

माझ्या मना आता पुन्हा
शोधु नको भरती जुनी लाटा जुन्या
जोडू नको तुटला दुवा
मागू नको मिटल्या खुणा
एकटा मी, एकटे मन, एकटी स्पंदने
स्वप्न आले, स्वप्न गेले, स्वप्न झाले जुने
सारे सुने

आता इथे तो चांदवा
ते नाही चांदणे
आता इथे राती सुन्या
माझे हे सुने जागणे
थोडे थोडे शब्द झाले सुटे
थोडे थोडे अर्थ झाले रिते

तुटली तार का झंकारते
नाते का असे रेंगाळते
शपथा कोरड्या झाल्या तरी
अजुनी ओल का रहाते
वेगळी जाहली दोन्ही ही मने
राहिली का तरी सोबती बंधने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here