माझे तुझे – Majhe Tujhe Lyrics in Marathi – मुरंबा 2017

0
2358
maze-tuze
गाण्याचे शीर्षक:माझे तुझे
चित्रपट:मुरंबा
गायक:अनुराधा कुबेर
संगीत:ऋषिकेश-सौरभ-जसराज
गीत:वैभव जोशी
संगीत लेबल:दशमी स्टुडिओज एलएलपी

माझे तुझे हे गीत मुरंबा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अनुराधा कुबेर हे आहेत. ह्या गीत ला संगीत ऋषिकेश-सौरभ-जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले आहेत. आणि दशमी स्टुडिओज एलएलपी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे

लपवुनी लपलेच नाही
लपवुनी लपलेच नाही
भेटणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे

चांदणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
दरवळाया लागली हि शांतता दोघातली
अअअअ….

दरवळाया लागली हि शांतता दोघातली
केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे
केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे
लपवुनी लपलेच नाही
लपवुनी लपलेच नाही

भेटणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे
हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो
हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो
आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे
आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे

लपवुनी लपलेच नाही
लपवुनी लपलेच नाही
भेटणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे

उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा
उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा
एकमेकानातुन आता एकमेकानातुन आता
तेवणे माझे तुझे
हम्म्म्म……हम्म्म्म्म…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here