गाण्याचे शीर्षक: | माझी लाखाची दौलत |
चित्रपट: | नाना मामा |
गायक: | वैशाली सामंत, महालक्ष्मी अय्यर |
माझी लाखाची दौलत हे गीत नाना मामा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक वैशाली सामंत, महालक्ष्मी अय्यर हे आहेत.
Marathi Lyrics
जरा जपून चढावा इश्क बाजीचा घाट
जागो जागी अडथला वळणा वळणाची वाट
अहो रंग महाली याव होईल नजराची भेट
नट रंगी अशी तुमची करते ख़ुशी….
तक लाऊन बघता का माझ्याकड….
माझी लाखाची दौलत तुमच्या कड…..
सजना दिलबरा मोहना
माझी लाखाची दौलत तुमच्या कड…..
काय करू कस करू धक धुक धक धुक…..
बघून तुम्हाला हिच काळीज उड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड…..
मस्ती धुंदीत मी नाचते आडवा धरून पदर मी लाजते
शालू झालाय तंग, खचला चोळीचा अंग……
अशी करते आता राया तुमच्या पुढ
माझी लाखाची दौलत तुमच्या कड…..
नव्या भेटीत ओळख जुनी
देना घेना करू चोरुनी……
अश्या धाग्या मधी
कैद होईल कधी….
सख्या तुम्हावरी जीव माझा जड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड…..
काय करू कस करू धक धुक धक धुक…..
बघून तुम्हाला हिच काळीज उड
माझी लाखाची दौलत तुमच्या कड…..