माझी पंढरीची माय – Majhi Pandharichi Maay Lyrics in Marathi – माऊली 2018

0
4523
Majhi-Pandharichi-Maay
गाण्याचे शीर्षक:माझी पंढरीची माय
चित्रपट:माऊली
गायक:अजय गोगावले
संगीत:अजय – अतुल
गीत:गुरु ठाकूर आणि अजय गोगावले
संगीत लेबल:जिओ स्टुडिओ, मुंबई फिल्म कंपनी

माझी पंढरीची माय हे गीत माऊली या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अजय गोगवळे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर आणि अजय गोगावले यांनी लिहिले आहेत. आणि जिओ स्टुडिओ, मुंबई फिल्म कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics


पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
हरीनामे झंकार विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

तू बाप तूच बंधू
तू सखा रे तुच त्राता रे
भूतली या पाठीराखा
तूच आता
अंधार यातनेचा
भोवती हा दाटलेला रे
संकटी या धावूनी ये
तूच आता

होऊन सावली हाकेस धावली
तुजवीण माऊली जगू कैसे
चुकलो जरी कधी तू वाट दावली
तुजवीण माऊली जगू कैसे

करकटावरी ठेवोनी
ठाकले विटेवर काय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
साजिरे स्वरूप सुंदर
तानभूक हारपून जाय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय

ना उरली भवभयचिंता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा

तू कळस तूच रे पाया
मज इतुके उमजुन जाता
राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता

लोचनात त्रिभूवन आवघे
लेकरांस गवसुन जाय
माझी पंढरीची माय ,माझी पंढरीची माय

संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो
जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो
सावळ्या सुखात इतुकी अोंजळी भरावी हो

भाबडा भाव अर्पिला
उधळली चिंता सारी हो
शरण गे माय आता लागले
चित्त हे तुझीया दारी हो

विझल्या मनातली दिपमाळ चेतली
बळ आज माऊली तुझे दे

‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय

मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय

पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
भक्तीचा उद्गार विठ्ठल

अंतरी मिळे पंढरी ..सावळा हरी ..भेटला तेथ
बोलला कुठे शोधीशी.. मला दशदिशी ..तुझ्या मी आत

जाहलो धन्य ..ना कुणी अन्य .. सांगतो स्वये जगजेठी
तेजात माखले प्राण ..लागले ध्यान.. उघडली ताटी

ना उरली भवभयिंचता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा

हेऽऽऽऽऽऽ ‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय

मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय

माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली माऊली

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रुप तुझे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here