गाण्याचे शीर्षक: | महाराष्ट्र गीत |
चित्रपट: | मी शिवाजी राजे भोसले बोलतोय |
गायक: | सुखविंदर सिंह, अजित परब, बेला शेंडे, नंदेश उमप, ऋषिकेश कामरकर, नेहा राजपाल |
संगीत दिग्दर्शक: | अजीत-अतुल-समीर |
गीत: | गुरु ठाकूर, अजित पराब, प्रकाश सावंत, आदण्यत दास, श्रीरंग गोडबोले |
महाराष्ट्र गीत हे गीत मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सुखविंदर सिंह, अजित परब, बेला शेंडे, नंदेश उमप, ऋषिकेश कामरकर, नेहा राजपाल हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजीत-अतुल-समीर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर, अजित पराब, प्रकाश सावंत, आदण्यत दास, श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
कंठातूनी लक्ष्या हुंकार झंकारून, होऊ द्या गर्जना
आकाश भेदुया जयघोष हा करुनी, देऊ या वंदना
मराठी मातीला मर्दाच्या मातेला, देई आम्हाला जी प्रेरणा
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा – नसातून चेतना
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हो महाराष्ट्र देशा
ओ…………………
दोस्तीमध्ये दोस्त आम्ही, देऊ प्राणाचीच कुरबानी
गद्दार त्या दुश्मनाचा
करू नित्यात अन पाजू पाणी
मी मराठी हो…..हो…..हो…जो म्हणे तो हो…हो…..
भाऊ रक्ताचा होऊन गेला
दिलदारी हो….हो….मी मराठी हो….हो….
आपले मानू तो आपलाच झाला
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा- नसातून चेतना
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हो महाराष्ट्र देशा
ओ…………………
जात्यावरती गात ओवी, उरी सांभाळी माय मराठी
संस्कार हे शिक्षणाचे, करी पिढ्यान- पिढ्यानवर ही ती
अभिमानी हो…हो…..स्वाभिमानी हो…..हो….
घेतले ही कधी खड्ग हाती
नव्या दारी हो….हो….सबला….ही हो….हो
जिंकुनी हे सारे जग जाई
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा- नसातून चेतना
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हो महाराष्ट्र देशा
ओ…………………