Home Marathi Songs महाराजांची कीर्ती बेफाम – Maharajachi Kirti Befam Lyrics in Marathi – मी...

महाराजांची कीर्ती बेफाम – Maharajachi Kirti Befam Lyrics in Marathi – मी शिवाजी राजे भोसले बोलतय 2009

0
951
Maharajachi-Kirti-Befam
गाण्याचे शीर्षक:महाराजांची कीर्ती बेफाम
चित्रपट:मी शिवाजी राजे भोसले बोलतय

महाराजांची कीर्ती बेफाम हे गीत मी शिवाजी राजे भोसले बोलतय या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=2UMzuhM0nkk

महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती
महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम
भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन
दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!

नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,
कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,
इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला
हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला
नाव त्याच अफजलखान …

जिता जागता जणू शैतान
खान बोलला छाती ठोकून,
शिवबाला टाकतो ठोकून
मरहबा, सुभानअल्लाह
कौतिक झाले दरबारात
खान निघाला मोठ्या गुरमित

त्याच घोडदल पायदळ
फौजा फाटा लई बक्कल
अंगी दहा हत्तीच बळ,
पाहणारा कापे चळचळ
वाटेत भेटेल त्याला चिरडीत,

ठेचीत खानाची सेना निघाली
गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली
आया बहि‍णींची आब्रू लुटली
कोण कोण रोखणार हे वादळ

आता शिवबाच काही खर नाही
इकडे निजाम, तिकडे मोगल
पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला
राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार
काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार

अश्या वाघिणीचा तो छावा….

गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा
भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,
प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान
हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …

दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची…..

अन त्यास नाही जाणीव शक्तिची……
अन करील काय कल्पना युक्तिची
हा जी जी जी …
महाराजानी निरोप घेतला …
न दंडवत घातला भावानीला

तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला

पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …

खानाच्या भेटीसाठी …
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …

सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …
रोखून नजर गगनी
जी र जी जी …

पण आपला राजा …
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी …

खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …
कट्यारीचा वार त्यान केला …

गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी

पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …

प्रतापगडाचे युद्ध जाहले …
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …
लावली गुलामिची हो वाट …
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks