मला जाऊ द्या ना घरी – Mala jau dya na ghari Song Lyrics in Marathi – नटरंग 2009

0
12895
vajle-ki-bara
गाण्याचे शीर्षक:मला जाऊ द्या ना घरी
चित्रपट:नटरंग
गायक:बेला शेंडे
संगीत दिग्दर्शक:अजय – अतुल
गीतकार:गुरु ठाकूर

मला जाऊ द्या ना घरी हे गीत नटरंग या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक अजय – अतुल आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना

राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा …
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

ऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंबऱ्यात
नादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
ऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची

नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गाचाची

शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना …
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

आला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना

नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना

मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताचि ही तुम्ही ऱ्हाऊ द्या …
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here