मराठी श्लोक – Marathi Shlok Lyrics In Marthi (Stotra)

0
10115
ganpati-bappa

सदा सर्वदा योग तूझा घडावा |
तुझे कारणी देह माझा पडावा |
उपेक्षू नको गूणवंता अनंता |
रघूनायका मागणे हेचि आतां ||

कैलास राणा शिव चंद्रमौळी |
फणींद्र माथा मुकुटी झळाळी ||
कारुण्य सिंधू भवदु:खहारी |
तुजवीण शंभो मज कोण तारी ||

मोरया मोरया मी बाळ तान्हें |
तुझीच सेवा करु काय जाणे ||
अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ||

ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे |
त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे ||
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी |
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ||

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |
तया आठविता महापुण्यराशी|
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here