मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे – Man Udhan Varyache, Guj Pavsache Lyrics in Marathi – अग बाई अरेच्चा 2004

0
1325
Man-Udhan-Varyache
गाण्याचे शीर्षक:मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे
चित्रपट:अग बाई अरेच्चा
गायक:शंकर महादेवन
संगीत दिग्दर्शक:केदार शिंदे

मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे हे गीत अग बाई अरेच्चा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक शंकर महादेवन हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक केदार शिंदे आहेत.

Marathi Lyrics

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिर्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासांच्या मागून पळते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here