मनुजा जाग जरा – Manuja Jaag Jara Song Lyrics in Marathi- Ashi Hi Banava Banavi 1988

0
2458
Jagi-sarv-sukhi-asa-kon-ahe-vichare-Song-Lyrics-Ashi-Hi-Banava-Banavi
गाण्याचे शीर्षक:मनुजा जाग जरा
चित्रपट:अशी ही बनवा बनवी
संगीत दिग्दर्शक:अरुण पौडवाल
गीत:शांताराम नंदगावकर
संगीत लेबल:सारेगम

Marathi Lyrics

जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे
जय जय रघुवीर समर्थ
हि दुनिया…हि दुनिया…हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा……
अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे
जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा…..

फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
किती आले किती गेले, भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले……
बीज होऊनी माती मधुनी अंकुर बनुनी यावे
जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मल व्हावे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा……

फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग……
थोडे द्यावे थोडे घ्यावे, एक मेका प्रेम द्यावे
हो जीवनाला रंग यावे, अवघे आनंदाचे रंग उधळावे…..
चाकावाचून गाडी नाही, ताकावाचून लोणी
अन मित्रावाचून जगात कैसा जगेल म्हणून कोणी
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा……
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग…….

अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे
जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा…..
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here