गाण्याचे शीर्षक: | भुत्याचे नमन |
चित्रपट: | पक पक पकाक |
गीत: | मिलिंद मोहिते |
भुत्याचे नमन हे गीत पक पक पकाक या चित्रपट मधले आहे. ह्या गीत चे शब्द मिलिंद मोहिते यांनी लिहिले आहेत
Marathi Lyrics
भुत्याचे नमन…..
भूत्याला शरण…..
देव रुसला अन शाप दिला गावाला
होय होय होय होय
थकलोय आम्ही या काळाच्या जाचाला
होय होय होय होय
जाऊ नये कोणी त्या राणेच्या वाटेला
रानात राहिलाय वस्तीला, हा हा हा हो
मंगलपाड्याच्या भूता, भूता भूता भूता
भुत्याचे नमन…..
भूत्याला शरण…..
भूत्याचा डब दबा, भीतीचा डोंगर……
गावाच्या वेशीवर तो थर
मंगलपाड्याच्या भूता, भूता भूता भूता
भुत्याचे नमन…..
भूत्याला शरण…..
कुठ आजार आला, भूत्याची करणी
कुठ अपघात झाला, भूत्याची करणी
कुणी मारून दिला, भूत्याची करणी
कुणी मारून गेला, भूत्याची करणी
भूत्याचा कोप उडे गावाची झोप
याला इलाज काय, धरा भुत्याचे पाय
हो वंदन असो या बळीच्या बकर्याला
वेसन घाली त्या रानातल्या भूत्याला, हो
मंगलपाड्याच्या भूता,
भूता भूता भूता