गाण्याचे शीर्षक: | बंजारा |
चित्रपट: | बोगदा (2018) |
गायक: | विशाल दादलानी |
संगीत: | सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल श्रृंगारपुरे |
गीत: | मंदार चोलकर |
बंजारा हे गीत बोगदा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक विशाल दादलानी हे आहेत. ह्या गीत ला संगीत सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल श्रृंगारपुरे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
खेळ जिंदगी चे कसे
डाव रंगू दे पुन्हा
आज सावली उन्हाचे
नाव रंगू दे पुन्हा
दिशा खुणावती रे तुला
तू वाट चाल पुन्हा
सारे पुकारतील तुला
सैरा वैरा जसा
एक बंजारा फिरतो तसा
जणू एक तारा घुमतो जसा
मन भटके पतंगा परी
हा बंजारा फिरतो तसा……२
आठवणींच्या फुटता लाटा
वाहून जाते सारे
उधान येता आनंदाला
येती पास किनारे
पुन्हा पुन्हा सूर जुळताना
पुन्हा पुन्हा ऊर भरताना
उडावे नव्याने दूर ….
पुन्हा वाटे जगताना
हाती घेता रे तोडून तू
आभाळी स्वार पुन्हा
वाऱ्यावरी जसे पाखरू
सैरा वैरा जसा
एक बंजारा फिरतो तसा
जणू एक तारा घुमतो जसा
मन भटके पतंगा परी
हा बंजारा फिरतो तसा……२