प्रेमाचा जांगडगुत्ता हे गीत आटपाडी नाईट्स या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे, वैशाली माडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत विजय गावंडे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द नारायण पुरी यांनी लिहिले आहेत. आणि मायदेश मिडिया यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | प्रेमाचा जांगडगुत्ता |
चित्रपट: | आटपाडी नाईट्स |
गायक: | आदर्श शिंदे, वैशाली माडे |
संगीत: | विजय गावंडे |
गीत: | नारायण पुरी |
संगीत लेबल: | मायदेश मिडिया |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=loT4oGVct5k
प्रेमाचा जांगडगुत्ता ग
जीव झाला खलबत्ता ग
उखळात खुपसले तोंड प्रिये
मुसळाचा तुंबळ रट्टा ग
आग्याबोडी नजर तुझी काळजावं माखली
आषाढीच्या ढगामंदी ऊन कधी सावली
लागना डोळा तुझ्या सपनांनी भारलं
बांधीन मी गळा तुझ्या नावाचं डोरलं
लई झाला गाजावाजा वरातील ढोलीबाजा
पिरतीच रॉकेट उडे सुरर सुट्टा ग
उरातल्या वावटळी वार तुझं लागलं
वाटेवरी तुझ्या रानी डोळं माझं टांगलं
ओढ तुझी लागली रे कसनुसं होतया
उधानले दिस माझे फुल्लारून येतया
झाली आता आबादानी होऊ दोघ राजारानी
बुंगाट जाऊ दोघ फुर्रर फट्ट ग