नाच गं घुमा – Naach Ga Ghuma Lyrics in Marathi – गर्ल्स 2019

0
1488
Naach-Ga-Ghuma

नाच गं घुमा हे गीत गर्ल्स या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत ला संगीत समीर सप्तीस्कर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अभिजित गायकवाड यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:नाच गं घुमा
चित्रपट:गर्ल्स
गायक:अवधूत गुप्ते
संगीत: समीर सप्तीस्कर
गीत:अभिजित गायकवाड
संगीत लेबल:एव्हरेस्ट मराठी

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=vXvuPwrkTnA

सखे तुझ्या हाती पाळण्याची दोरी
जगासि तूच उद्धारी,
मोडुन दे रीती, कशाची भीती?
घुमू दे उंच ललकारी

स्वत:ची हो गुरू, मागे नको फिरू
ओलांड तू गं उंबरा;
होऊ नको उदास, घे मोकळा हा श्वास
वारा बांधून पायाला…

नाच गं घुमा, कशी मी नाचू?
नाच गं घुमा, गो माजे बाय!

निर्दोष-दोषी ठरवेल कोण इथे सारेच फसवे
धीर धरुनी कर तू प्रवास आहेस तू तुझ्या सवे
अवघड हेच क्षण, जाऊ नको खचून
इथे लागेल कस जरा

सापडेल तुला वाट, होईल उद्या पहाट
भिऊ नकोस अंधारा
नाच गं घुमा… कशी मी नाचू..
नाच गं घुमा गं माझे बाय

फाडून दे तू खोटे मुखवटे पुढे नको हा वारसा,
पोकळ या साऱ्या ढोंगी जगाला
दाखव आज आरसा
सोसू नकोस हाल,अशी तोऱ्यात चाल

झुकू दे त्यांच्या नजरा
काट्याकुट्याची वाट,हो चालण्या तयार
आता खोचून पदरा
नाच गं घुमा कशी मी नाचू…
नाच गं घुमा गं माझे बाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here