दूर दूर – Dur Dur Lyrics in Marathi – मितवा 2015

0
3262
dur-dur
गाण्याचे शीर्षक :दूर दूर
चित्रपट:मितवा (2015)

दूर दूर हे गीत मितवा या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान

दूर दूर चालली आज माझी सावली
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले सोबती

काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबती

लाभतो सारा दिलासा कोणता केला गुन्हा
जिंकुनी हि खेळ सारा हारते मी का पुन्हा
त्रास लाखो भास लाखो कोणते मानू खरे
उरण्या त्या पावसाचे घाव मनावर का चढे

समजावतो मी या मना
तरी आसवे का वाहती
उरलो हरलो दुखः झाले सोबती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here