गाण्याचे शीर्षक: | तोळा तोळा |
चित्रपट: | तू ही रे (2015) |
गायक: | बेला शेंडे, अमित राज |
संगीत: | अमित राज |
गीत: | गुरु ठाकूर |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
तोळा तोळा हे गीत तू ही रे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे, अमित राज हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमित राज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो….
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
तुझ्या नशील्या नजरेत मी ही गुरफटते
शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते
हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो…
तुझाच होतो जगणे ही माझे मी विसरतो
करु नये ते सारे काही तुझ्या साठी करतो
ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो..