तू जिथे मी तिथे हे गीत फोटोकॉपी या चित्रपट मधले असून या गीत चे गायक स्वप्निल बांदोडकर, नेहा राजपाल हे आहेत. ह्या गीत ला संगीत निलेश मोहरीर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | तू जिथे मी तिथे |
चित्रपट: | फोटोकॉपी |
गायक: | स्वप्निल बांदोडकर, नेहा राजपाल |
संगीत: | निलेश मोहरीर |
गीत: | अश्विनी शेंडे |
संगीत लेबल: | एव्हरेस्ट मराठी |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=qdivdOKT-1k
सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे
शोधते स्वतःला भेटुनी तुला
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
गुणगुणावे मी तुला मग तू मलाही सुचावे
बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
बोलणे नको हे सांगणे आता
पण मग आपुल्या मौनास काही अर्थ ये नवा
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे….
सांगणे सुखाचे ऐकवू जगा
पण मग आपुल्या नात्यास काही अर्थ ये नवा
तू जिथे मी तिथे…
स्वप्न वेडे पाहिले आता
ऐकण्या आतुरल्या दिशा…
मी न माझी राहिले आता….