तुला पाहता – Tula Pahata Song Lyrics in Marathi – मुंबई पुणे मुंबई 3 (2018)

0
1652
tula-pahata
गाण्याचे शीर्षक:तुला पाहता
चित्रपट:मुंबई पुणे मुंबई 3 (2017)
गायक:ऋषिकेश रानडे
संगीत:अविनाश-विश्वजीत
गीत:विश्वजीत जोशी आणि जय अत्रे
संगीत लेबल:एव्हरेस्ट मराठी

तुला पाहता हे गीत मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ऋषिकेश रानडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द विश्वजीत जोशी आणि जय अत्रे यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

तुला पाहता आजही ,
हासते या मनी चांदणे
बहरुन प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी

ओंजळीतूनी भरूनी जो आणतो, सुख नवे,
पाऊस तो पहिला,
ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या,
स्पर्श तुझा होता,
जरा जरा लाजरे,
तुझ्या सवे साजरे,

ॠतूंचे खरे सोहळे,
ॠतूंचे खरे सोहळे,
बहरून प्रीत ये अशी,
गाली पडे खळी जशी,
साथ तुझी मला हवी जीवनी…

सावली तुझी भासते मी जिथे तू तिथे,
बंध हे जन्मांचे,
पापणीवरी गुंफते माळते रात ही,
रंग हे स्वप्नांचे
हळू हळू जोडले,
हळू हळू जोडले

मनाने मनाशी दुवे,
बहरून प्रीत ये अशी,
गाली पडे खळी जशी,
साथ तुझी मला हवी जीवनी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here