तुमच्या संग मला येउद्या किर – Tumchya sang mla yeudya kira Lyrics in Marathi – मुका घ्या मुका 1987

0
1216
tumchyasanga-mala-yeudhya-kira
गाण्याचे शीर्षक:तुमच्या संग मला येउद्या किर
चित्रपट:मुका घ्या मुका

तुमच्या संग मला येउद्या किर हे गीत मुका घ्या मुका या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

तुमच्या संग मला येउद्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की……
मला सोडून जातंय खर
नाही व्हणार तुमच बर
घरी ठेवतात कोंडून पोर
बंद होणार देवाची दार…

अरे दिंड्या न वारकरी पाहुद्या
अरे दिंड्या न वारकरी पाहुद्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की
तुमच्या संग मला येउद्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की

हे हाय का तुम्हाला ठाव
गोर गरिबाला संगती न्हाव
जो दावतोय दुजाभाव
त्याला कसा ग पावना देव
अरे तीर्थ प्रसाद मला खाऊद्या
अरे तीर्थ प्रसाद मला खाऊद्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की…..

नाही बोलणार वाईट कुणा
माफ कराव एवढा गुन्हा
नका दुखवू माझ मन
हात जोडूनी सांगतोय पुन्हा
अरे कपाळी भंडारा लाऊद्या

अरे कपाळी भंडारा लाऊद्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की
तुमच्या संग मला येउद्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की
आता शेवटच सांगतोय ऐका

मला नको सोन नान पैका
ज्याला थोडीशी जाणीव हाय का
असा तुमच्यामंधी कोण नाय का
चंद्र भागेच पाणी पिऊ द्या
चंद्र भागेच पाणी पिऊ द्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की

तुमच्या संग मला येउद्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की
कपाळी भंडारा लाऊद्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की
राम नामाचा गजर गाऊ द्या किर
देवाच दर्शन घेऊ द्या की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here