तुझ लगीन साळू की भुलू भुलू वाळू – Tuz Lagin Salu Ki Bhulu Bhulu Vaalu Song Lyrics in Marathi – पक पक पकाक 2005

0
1144
tujh-lageen-saalu
गाण्याचे शीर्षक:तुझ लगीन साळू की भुलू भुलू वाळू
चित्रपट:पक पक पकाक
गायक:मिलिंद मोहिते

तुझ लगीन साळू की भुलू भुलू वाळू हे गीत पक पक पकाक या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मिलिंद मोहिते हे आहेत.

Marathi Lyrics

तुझ लगीन साळू की भुलू भुलू वाळू
कुणा कुणाच्या पकडीत येईना
पोटभर दादले दारी तुझ्या आणले
तरीबी लगीन तुझ होईना
धिंगपांग वरात धिंगपांग बाज

आम्हाला नाचता येईना
मनभर उखाणे आवशीने वेचिले
पण लग्नाचच नाव साळू घेईना
टिंग टँग टिंग, तुंग टॅंग टंग
टिंग टांग टांग…….

सांग सांग साळू कानात हळू हळू
तुझ्या कपाळी कोण बधणार
कुणाच्या डोक्यावर वाटणार मिऱ्या ग
कुणाच्या दारी तू नांदणार
मला हवा असा सरदार

जरी ज्याचा देह पिळदार
दाधी मिशा जरी भरदार
तरी जो असेल दिलदार
असे ज्याच्या नजरेला धार
एकाच नजरेत करील गार जो मला
होईन त्याची हो राणी मी
येईल जो चेतकावर स्वार

हर हर महादेव…….

देवा रे देवा पावलास तू
मनजोगा दादला दावलास तू
या या या या या
देवा रे देवा रागवलास तू
अस कसा दादला दावलास तू
केली तरी काय तुझी चोरी मी
कश्यापाई माझ्याव कावलास तू

पादर्या पावत्या फाडायची नाय मी
त्या परीस लगीन करायची नाय मी
तुझ लगीन साळू की भुलू भुलू वाळू
कुणा कुणाच्या पकडीत येईना
अग, पोटभर दादले दारी तुझ्या आणले
तरीबी लगीन तुझ होईना
धिंगपांग वरात धिंगपांग बाज

आम्हाला नाचता येईना
मनभर उखाणे आवशीने वेचिले
पण लग्नाचच नाव साळू घेईना
टिंग टँग टिंग, तुंग टॅंग टंग
टिंग टांग टांग…….

सांग सांग साळू कानात हळू हळू
तुझ्या कपाळी कोण बधणार
कुणाच्या डोक्यावर वाटणार मिऱ्या ग
कुणाच्या दारी तू नांदणार
कष्टायची भाकर मिळवील जो
मला पिरमाचा तुकडा भरवील जो……

बनून माझ बुजगावन
जिवाण माझी राखण करील जो
प्रीतीची भेट करून बहाल
मला फुलावानी हळुवार ठेवील जो
देवा रे देवा पावलास तू
मनजोगा दादला दावलास तू
है या है या है या……

देवा रे देवा रागवलास तू
हिला अस कसा दादला दावलास तू
केली तरी काय तुझी चोरी मी
कश्यापाई माझ्याव कावलास तू
मारक्या रेड्या भालायची नाय मी
त्या परीस लगीन करायची नाय…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here