गाण्याचे शीर्षक: | तुझ्यात जीव रंगला |
गायक: | आनंदी जोशी |
संगीत: | एव्ही प्रफुल्लचंद्र |
गीत: | श्रीरंग गोडबोले |
संगीत लेबल: | झी मराठी |
Marathi Lyrics
भुइलाया मेघुटांचं दान
चहूंकडं बहरलं रान
पाटामदी झुळुझुळु पाणी
पाखरांच्या चोचींतली गाणी
शेतामधे राबणारा
लेक काळ्या मातीचा
रांगडा तो मर्द माझा
आभाळाच्या छातीचा
वेडापिसा छंद असा लागला
तुझ्यात जीव रंगला…
रंगला …
तुझा जीव झाला येडापिसा… गुंगला
हा हरपून देहभान… झिंगला
ह्या पिरतीच्या रंगामंधि… दंगला