गाण्याचे शीर्षक: | तरुणाई |
चित्रपट: | स्पंदन |
तरुणाई हे गीत स्पंदन या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
ही तरुणाई
आभाळाची निळाई सागराची गहराई
हरेक क्षणाच्या डोळ्यातली रोषणाई
कधी वाटा पुढती पळते
कधी जागीच गिरक्या घेते
वारा ही पारा ही हातात ठरत नाही रे नाही नाही
ही थरथरती वेळ
हा हूरहुरण्याचा खेळ
आभाळ सांगते कानात हिच्या रे काही रे काहीबाही
या हृदयाच्या ठोक्याने
ही झुलवीत जाई गाणे
रंगते सांगते स्वप्नांच्या देशीची बेधुन्द नवलाई
मेघ होऊन कधी हुंकारे
सतार होऊन कधी झंकारे
दिसते अशी की घाटात सजते हिरवी वनराई
ही मैफिल एक सुहानी
ही मादक अन् मस्तानी
ही शहाण्याहूनही शहानी
कधी कम्बख्ताची गाणी
‘ये’ म्हणून येईना.’जा जा’ म्हणून
जात ती नाही नाही नाही