Home Marathi Songs झिम्मा नको न फुगडी नको – zimma nako n phubdi nako Song...

झिम्मा नको न फुगडी नको – zimma nako n phubdi nako Song Lyrics in Marathi – मुका घ्या मुका 1987

0
1342
zimma-nako -n-phubdi-nako
गाण्याचे शीर्षक:झिम्मा नको न फुगडी नको
चित्रपट:मुका घ्या मुका

झिम्मा नको न फुगडी नको हे गीत मुका घ्या मुका या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

झिम्मा नको न फुगडी नको…….२
खेळूया गनबा दुपार…….२
खटपट करून झटपट धरून
पटकन घेऊ का मुका
ए………मुका
झिम्मा नको न फुगडी नको…….२
खेळूया गनबा दुपार…….२

खटपट करून झटपट धरून
पटकन घेऊ का मुका
ए………मुका
हि कोपरी कोणी ग शिवली
आर शिवली र का उकिरड्यावर गावली
हि इचार करून खाल्ली
काय खाल्ली ग मला भक्कन उलटीच झाली

हे येड न बाल, दिसतंय बावळट
ह्याच्या बेंबी ला लाऊ थुक्का
अरे ह्याच्या बेंबी ला लाऊ थुक्का
नटून थटून सजून थजून
घेईन मी याचा मुका
झिम्मा नको न फुगडी नको…….२

ह्याच्या नाकात शेंबूड माईना
अग माईना ग दोन्ही डोळ्यांची छप्पड जाईना
ह्याची बगून सारी दैना
अरे दैना ग मला चक्कर कशी ग येईना
आता काय करू न कुठ ग धरू……२

घालू का पाठीत बुक्का
याच्या घालू का पाठीत बुक्का
धुवून पुसून लख लख घासून
घेईन मी याचा मुका
ए……..मुका
झिम्मा नको न फुगडी नको…….२

लय स्वभाव याचा द्वाड
अग द्वाड ग याला बगताच गोध
कोण जाणार याच्या पुढे
अग पुढ र रेडा घेऊन फिरतंय येड
बोलायला येईना ग चालायला येईना……२

याचा जन्म गेला फुक्का
अरे याचा जन्म गेला फुक्का
पेन्सिल गिरवून पाटीवर गिरवून
घेईन मी याचा मुका
ए…….मुका
झिम्मा नको न फुगडी नको…….२

याच लगीन कस ग व्हायचा
अरे व्हायचं ग याला कोण ग पोरगी द्यायचं
याच्या घरात कस ग राहायचं
अरे राहायचं ग याचा संसार कोणी ग करायचा
असाच मरायचं न फुकट जायचं…..२

मुळात खोटा शिक्का
यो तर मुळात खोटा शिक्का
खनखन वाजवून साऱ्यांना लाजवून
घेईन मी याचा मुका
झिम्मा नको न फुगडी नको…….२
खेळूया गनबा दुपार…….२

खटपट करून झटपट धरून
पटकन घेऊ का मुका
ए………मुका
झिम्मा नको न फुगडी नको…….२
खेळूया गनबा दुपार…….२
खटपट करून झटपट धरून
पटकन घेऊ का मुका
ए………मुका

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks